Monday, 14 September 2020

किराणामाल

                        

                         किराणामाल.....

परवा घरातला किराणा माल संपला म्हणून माझ्या मूलीने  माझ्या कडून मालाची यादी घेतली आणि भराभर मोबाईल वरून ऑनलाईन यादीतील सामान मागवले.दुस-या दिवशी घराच्या दारात सामान आले.क्षणभर वाटले बरं आहे ओझ उचलायचं कामच नाही आणि पायपीट पण नाही!


पण ते सामान काढून भरताना मला आठवण झाली ती माझ्या लहानपणीची ! किराणा दुकानाची. दुकानात जाऊन किराणा माल आणण्याची मज्जाच काही वेगळी होती.पगार झाला कि येणा-या रविवारी आमच्या कडे माल भरला जाई.मालाची यादी आई तयारच ठेवायची.आम्हा भावंडा पैकी एकजण कोणीतरी बाबांन सोबत जात असत. किराणा दुकानातील मालकाला आंम्ही भास्कर काका म्हणत असू.भास्कर काकांचे दुकान आम्हाला आमचेच वाटायचे परंतु घरातुन बाहेर पडताना च बाबांनी कशाला हात लावायचा नाही,अशी ताकीद दिलेली असे.दुकानात गेले कि बाबा भास्कर काकांच्या हातात यादी देत त्यावर एकदा नजर फिरवून ते गड्याकडे देवून माल भरण्यास सांगत.मग बाबांच्या आणि काकांच्या गप्पा रंगत.त्या ऐकण्यास मज्जा यायची.पण मला आवडायच ते मुनीम काका एक एक सामान सांगायचे आणि ते दुसरं कोणी तरी मोजून द्यायच.मग निघताना काकांन कडून एखादं चाॅकलेट(पारलेच किसमी) किंवा गोळी मिळायची. तेव्हा आनंद गगनात मावायचा नाही.

किराणा दुकानदार तेंव्हा परका नसायचाच.वर्षीनुवर्ष एकच दुकान ठरलेलं असायचं.घरातील अर्थिक अडचणी घरातल्यां पेक्षा त्यांनाच माहित असायच्या.पण त्याचा बोभाटा न करता वेळ सांभाळून न्यायचे.घरातील लग्न कार्य असो नाहीतर दु:खद प्रसंग किराणा मालाची कधी अडचण नसायची.अशा प्रसंगात कधी पैशाचा तगादा नसायचा.कारण गि-हाईकावर पूर्ण विश्र्वास होता आणि गि-हाईक ही त्या विश्वासास पात्र ठरत दोघांमध्ये सहज विश्वासाचे आपुलकीचे नेहमीचे नाते निर्माण होत असे.

आता ही तिचं माणसे आहेत गरजा ही त्याच आहेत पण ना आपुलकी आहे ना विश्वास.....आहे फक्त दुकानदार आणि गि-हाईक यांच्यातील व्यवहार!!!!!!


2 comments:

  1. कालाय तस्मै नम: । इतकंच म्हणू शकतो आपण आता.

    ReplyDelete
  2. बालपण आठवले

    ReplyDelete