माझी झाड........
मला झाड खूप आवडतात लहान, मोठी, बहरलेली, वाळलेली कशीही.मला त्यांच्याशी बोलायला आवडत. त्यांच्याकडे बघते तेव्हा ते ही एकमेकांशी बोलतात हे जाणवत. त्यांच्या पानांच्या हालचालीतून दिसतो त्यांचा संवाद कळतात त्यांच्या भावना !! आणि म्हणूनच आम्ही नवीन घर (flat)घेतलं तेंव्हा छोट्याशा गॅलरी त आधी कुंड्या ठेवायची सोय केली.मोगरा,जास्वंद, गुलाब,निशीगंध, कुंदा,शेवंती,पाम.अशी फुल देणारी आणि हिरवीशोभेची झाड नर्सरी तून आणून लावली.थोड्याच दिवसांत ही माझी झाड मस्त बाळसं धरू लागली.सकाळी उठल्या उठल्या मी आधी त्यांना बघून यायची. पाणी घालायचं आणि कोणाला कळी आली आहे का, कोणाला नवीन पान आलआहे का ,किड लागली आहे का?हे सगळं बघत त्यांच्याशी संवाद करत होते.त्यांना येणार्या नवीन कळ्या पाने बघून निसर्ग सृजनाच्या चमत्काराने आनंद व्हायचा, मस्त वाटायचं!!सगळी झाड मस्त बहरली.माझ्या कुंदाच्या झाडाला तर इतकी फुल येत की जणू चांदण्याच.हिरवा आणि पांढर्या रंगाने झाड अजूनच सुंदर दिसत होतं.
पण माझ्या या निसर्ग धनाला दृष्टच लागली .आमच्या सोसायटीने नोटीस काढली बाहेरच्या बाजूला स्टॅंड करुन ठेवलेल्या कुंड्या काढून घ्याव्यात.त्या आतल्या बाजूला ठेवाव्यात अथवा खाली आणून ठेवाव्यात.ते वाचून मला बैचेन व्हायला लागलं कारण घर लहान असल्याने गॅलरीत आतल्याबाजूने खूप सामान ठेवले होते. त्यामुळे आता आत ठेवणे शक्य नव्हते आणि खाली ठेवल्यावर त्यांची होणारी परवड दिसत होती.कारण सगळ्यांच्याच कुंड्या खाली येणार होत्या. सारखं बैचेन होत होत. लवकर निर्णय नाही घेतला तर ५०००रुपयांचा दंड होणार होता.
पण माझ्या झाडांवरच्या प्रेमाने स्वामींनी सोय केली.माझ्या सासु सासर्यांना भेटण्यासाठी माझे दिर नगरहून गाडी घेऊन आले होते.मी त्यांना हे सगळे सांगितले तेंव्हा ते सगळ्या कुंड्या गाडीतून नेण्यास तयार झाले.त्यांचे बैठे घर असल्याने काही अडचण नव्हती आणि त्यांना स्वत:लाही झाडांची खूप आवड आहे .त्यांच्याकडे पण खूप झाडे आहेत.माझ्या झाडांना योग्य पालक मिळाला त्यामुळे मला खूपच आनंद झाला होता.
पण जेव्हा खरच सगळी झाड निघाली तेंव्हा मात्र मला रडायला च येत होतं.मी सारखी त्यांच्यावरन हात फिरवत होते त्यांना सांगत होते छान रहा तिथेही असेच बहरा, फुला...!मला सगळे घरातले हसत होते.बोलत नसले तरी ते माझे सखा सोबती होते आणि म्हणतातच ना माणसांच्या शेजारा पेक्षा झाडांचा बरा.!!
आजही माझ्या झाडांची रिकामी जागा बघून मला कसतरी होत.आणि वाटतं त्यांनाही माझी आठवण येत असेन का? त्यावर माझंच मन म्हणत नक्कीच येत असेन हात,पाय,शरीर नसले तरी त्यांनाही असतात ग संवेदना!!वार्याच्या लहरीं सोबत ते तुझी आठवण पाठवत असतीलच तेंव्हाच तर तूझ मन त्यांच्यासाठी इतक भावपूर्ण होतेस!!!!!
No comments:
Post a Comment