Thursday, 10 September 2020

संध्याकाळ....

 संध्याकाळ.......

       माझे घर पूर्व-पश्चिम असल्याने सू्र्योद्य पूर्ण नाही पण सूर्यास्त मात्र छान दिसतो.सध्याच्या परिस्थिती मुळे कंटाळा आला होता,मन ही अशांत होते.म्हणून गॅलरीत बसले  आणि सूर्यास्त बघत होते.पण तो बघत असताना मनात अनेक विचार गर्दी करत होते.क्षणाक्षणाला आकाशातले रंग बदलत होते.निरभ्र निळ्या रंगात राखाडी आणि केशरी रंगाची उधळण मनमोहक दिसत होती.ढगाच्या आड अस्ताला जाताना तो तेजस्वी गोल त्याच्या तेजाने आकाशाची आभा वाढवत होता!!!!

      क्षणात मनात विचार आला.माणसाचा अस्त ही असाच हवा. तो अस्ताला गेला तरी त्याच्या आठवणींच्या रंगाने सगळ्यांच्याच मनात त्याच्या आठवांची. चांगुलपणा ची सुंदर रांगोळी उठली पाहीजे.त्याच्या कतृत्वाची, प्रसन्नतेची आभा तो नसला तरी सगळ्यांच्या भोवती दाटून यायला हवी!!!

     असे झाले तर माणूस जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही!!!!😊😊😊😊

         सौ.प्राजक्ता देशपांडे😊

No comments:

Post a Comment